Ashok Chavan | ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अशोक चव्हाणांचं ट्वीट, राजकीय वर्तुळात चर्चा
कुठे आहे यूपीए?… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच हा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या सवालावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंटा आणि घोड्यासारखी नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे.
कुठे आहे यूपीए?… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच हा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या सवालावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंटा आणि घोड्यासारखी नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करून ममतादीदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा टोला लगावला आहे. सोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचं वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. अलिकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असंही चव्हाण यांनी नमूद केलं आहे.