काका-पुतणे एकत्र येणार? राष्ट्रवादीची पुन्हा घडी बसणार? आशुतोष काळे म्हणतात…
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सराकरमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप आला आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या या फूटीवर आमदार आशुतोष पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सराकरमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप आला आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या फूटीदरम्यान आमदार आशुतोष काळे हे परदेश दौऱ्यावर होते. परदेशातून मायदेशी आल्यानंतर काळे यांनी प्रथम अजित पवारांची भेट घेत त्यांना पाठींबा दिला. काळे हे आज मतदारसंघात पोहचले असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतायत. “सत्तेत राहून जनतेची कामे अधिक होतात त्यामुळे विकासासाठी अजित पवारांसोबत गेल्याच” काळे यांनी म्हटलं. “तसेच माझ्या आजोबांपासून काळे आणि पवार कुटुंबाचे संबंध आहेत.आज गट वेगळे असले तरी संबंध कायम राहतील. या निर्णयाच वाईट वाटतं पण भविष्यकाळात दोघही एकत्र येतील , राष्ट्रवादी एकसंघ राहील. गट दिसत असले तरी राष्ट्रवादी हा परिवार आहे,” असं काळे म्हणाले.