निवडणूक आयोग पाळीव आयोग झालाय, राष्ट्रवादीच्या निकालानंतर कुणाचा हल्लाबोल?
अजित पवार गटाकडे पक्ष आणि चिन्ह गेलं आहे तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर कायदेतज्ज्ञ वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगानं कुणाचा अपेक्षाभंग केला नाही, कारण....
पालघर, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निकाल जारी केला. यानिकालानुसार अजित पवार गटाकडे पक्ष आणि चिन्ह गेलं आहे तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर कायदेतज्ज्ञ वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगानं कुणाचा अपेक्षाभंग केला नाही, कारण निकाल असाच येणार याची अपेक्षा होतीच. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग हा असाच निर्णय देणार याबाबतची खात्री संपूर्ण महाराष्ट्राला होती. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह दिले आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी विविध यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. त्यामधे निवडणूक आयोग पाळीव आयोग झाला आहे, असे वक्तव्य असीम सरोदे यांनी केले आहे. असीम सरोदे हे पालघर येथे एका कार्यक्रमात आले होते, त्यावेळी त्यांनी हल्लाबोल केलाय.