19 बंगल्याबाबत Rashmi Thackeray यांना विचारा, आणि दोन्ही जोड्याने मारा – Kirit Somaiya
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच (sanjay raut) या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल करतानाच मला चप्पलेने मारणार ते ठिक आहे. पण हरवलेल्या 19 बंगल्यावर बोला. त्याचे उत्तर द्या, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसेच राऊत यांनी केलेले सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधातील कागदपत्रे असतील तर त्यांनी ती मीडियाला द्यावीत, असं आव्हानही त्यांनी राऊत यांना दिलं.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
