विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, आमदारांची पुन्हा परीक्षा, कोणाची मतं फुटणार? कोणाचा एक उमेदवार पडणार
११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून १२ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. क्रॉस वोटिंगची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. महायुती महाविकास आघाडीकडून कोणाला संधी देण्यात आली, बघा स्पेशल रिपोर्ट?
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून १२ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. क्रॉस वोटिंगची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला असता महायुतीकडून ९ उमेदवार दिलेत तर मविआने ३ उमेदवार दिलेत. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत, शिंदेंकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून कोणाला संधी देण्यात आली बघा स्पेशल रिपोर्ट?
Published on: Jul 03, 2024 11:13 AM
Latest Videos