Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता? काय सांगतो एक्झिट पोल?

भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता? काय सांगतो एक्झिट पोल?

| Updated on: Oct 06, 2024 | 10:56 AM

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्यात. मंगळवारी या निवडणुकीचा निकाल येणार आहेत. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळतंय.

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. मात्र दोन्ही ठिकाणी एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा झटका बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सी व्होटरच्या पोलनुसार, भाजप २७ ते ३२, काँग्रेस आणि एन.सी ४० ते ४८ जागा, पीडीपी ६ ते १२ जागा आणि इतर ६ ते ११ जागा मिळतील असा अंदाज आहे तर पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार, भाजप २३ ते २७, काँग्रेस आणि एन.सीला ४६ ते ५०, पीडीपीला ७ ते ११ आणि इतरला ५ ते ६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. मात्र एक्झिट पोलनुसार, जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जनतेची काँग्रेसला पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 06, 2024 10:56 AM