विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? भाजपला सर्वाधिक जागा तर शिंदे-दादांना किती जागा?
जागा वाटपाच्या चर्चेत यावेळी महायुतीने आघाडी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत झालेल्या चर्चेनुसार भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. पहिल्या टप्प्यातील चर्चेनुसार शिंदे किंवा अजित पवार यांना तीन आकडी जागा लढवण्यास मिळतील याची शक्यता नाहीये. त्यामुळे यापुढच्या चर्चांमध्ये कोणाला किती जागा मिळणार?
महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपाच्या चर्चेत यावेळी महायुतीने आघाडी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत झालेल्या चर्चेनुसार भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, १५५ जागा भाजप, शिंदेंची शिवसेना ६०-६५ तर अजित पवार यांची राष्ट्रवादी ५०- ५५ जागा सोडण्याचा विचार होतोय. तर मित्र पक्षांना १५ जागा सोडण्यात येण्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांनी ८० ते ९० जागांची मागणी केली होती. तर शिंदे गटाच्या रामदास कदमांनी किमान १०० जागांचा आग्रह धरला होता. मात्र पहिल्या टप्प्यातील चर्चेनुसार शिंदे किंवा अजित पवार यांना तीन आकडी जागा लढवण्यास मिळतील याची शक्यता नाहीये. त्यामुळे यापुढच्या चर्चांमध्ये कोण किती तडजोड करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.