ठाकरेंच्या नार्वेकरांकडून फिल्डिंग, महायुतीसोबत सेटिंग? महायुतीचे 9 उमेदवार अन् फडणवीस खेळ करणार?
मिलिंद नार्वेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली. गुप्त मतदान पद्धतीने आधीच क्रॉस व्होटिंगची भिती आहे. त्यातच सर्वपक्षीय संबंधामुळे नार्वेकरांनी महायुतीच्या नेत्यांच्याही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत विजयाचा कोटा २३ मतांची आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण १६ आमदार आहेत.
विधानपरिषदेची निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. अशातच सर्वात जास्त फोकसमध्ये आलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर… मिलिंद नार्वेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली. गुप्त मतदान पद्धतीने आधीच क्रॉस व्होटिंगची भिती आहे. त्यातच सर्वपक्षीय संबंधामुळे नार्वेकरांनी महायुतीच्या नेत्यांच्याही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत विजयाचा कोटा २३ मतांची आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण १६ आमदार आहेत. असं असताना नार्वेकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनीही मिलिंद नार्वेकर यांच्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. तर विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १२ उमेगवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका-एका आमदारांचं मतं महत्त्वाचं आहे. तर एका आमदारांचा पराभव होणार हे अटळ आहे. नार्वेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिंदेंचे मंत्री उदय सामंत, बविआचे हितेंद्र ठाकूर तर दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. बघा नेमकी काय झाली चर्चा?