'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका; काय केली तक्रार?

‘भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब’, वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका; काय केली तक्रार?

| Updated on: Oct 08, 2024 | 1:16 PM

केंद्रातील सत्ता स्थापन झाल्यानंतर चार महिन्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा काँग्रेस आघाडीवर होतं पण अचानक भाजपने मुसंडी मारली. अशातच आता काँग्रेसने निवडणूक आयोगावरच शंका उपस्थित कली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग किंवा आयोगाची वेबसाईट म्हणजे भाजप आहे आणि ते काहीही करू शकतात, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी भाजपवर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता काँग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील निवडणुकीच्या आकड्यावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. प्रशासनावर भाजपचा दबाव असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसकडून कऱण्यात आला आहे. इतकंच नाहीतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडे हे संभ्रम निर्माण करणारे असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. आयोगाच्या वेबसाईटवर निवडणुकीच्या निकालाचे आकडे उशिरानं अपडेट होत असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने उत्तर पाठवलं आहे. सर्व निकाल स्पष्ट आणि समोर असल्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. उमेदवारांसमोरच मतमोजणी सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

Published on: Oct 08, 2024 01:16 PM