देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात पार पडणार आहेत. तर त्याचे निकालही २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील कोल्हापुरातील महायुतीच्या सभेसाठी हजर राहणार आहेत. तर आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला असून राज्यभरात फडणवीस हे ६ दिवसांमध्ये २१ सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात २१ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रासह अर्धा महाराष्ट्र ढवळून काढणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही सभा होणार आहेत. दरम्यान, येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण चार ठिकाणी देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.