विधानसभेचा प्रचार तापला, ‘व्होट जिहाद’ला ‘धर्मयुद्धा’नं उत्तर, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नोमानी यांनी वोट जिहादचं आवाहन केलं. नोमानी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले आणि महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हटलंय. यावर देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्धानं उत्तर देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता व्होट जिहाद विरूद्ध धर्मयुद्ध या ट्रॅकवर आली आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नोमानी यांनी वोट जिहादचं आवाहन केलं. नोमानी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले आणि महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हटलंय. यावर देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्धानं उत्तर देण्याची घोषणा केली. तर लोकसभा निवडणुकीवर बोट ठेवत शरद पवारांनी पुण्याचं उदाहरण देत आम्हीही जिहाद म्हणायचं का? असं म्हणत पवारांनी ब्राम्हण मतांवर बोट ठेवलंय. पुण्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा १ लाख २३ हजार ३८ मतांनी पराभव केला. पुण्यात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार होते. त्यापैकी ११ लाख ४ हजार ५७२ जणांनी मतदान केलं. त्यातील ६ लाख मतदार हे ब्राम्हण होते. शरद पवार म्हणाले लोकसभेला अल्पसंख्यांकांनी मविआला मतदान केलं. मग विशिष्ट हिंदू समाजाने भाजपला मतदान केलं. त्याला वोट जिहाद म्हणणार का? असा सवाल शरद पवार यांनी केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट