Monsoon Session Video : प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला, कारभाराचे वाभाडे काढले : देवेंद्र फडणवीस

Monsoon Session Video : प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला, कारभाराचे वाभाडे काढले : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 06, 2021 | 4:53 PM

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असं देवेंद्र फडणवीस स्पष्ट केलं. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. प्रतिविधानसभा भरवण्याची वेळ का आली हेही त्यांनी यावेळी सांगितलं.