फटाके फुटायला अजून वेळ आहे, शिवसेना आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत भाष्य केले आहे. लोकशाहीमध्ये अनेकांचे निर्णय बहुमतावर होतात, असे म्हणत राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला आणि कायद्याला अपेक्षित निर्णय देणार असल्याचे म्हणत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत भाष्य केले आहे. लोकशाहीमध्ये अनेकांचे निर्णय बहुमतावर होतात, असे म्हणत राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला आणि कायद्याला अपेक्षित निर्णय देणार असल्याचे म्हणत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला तर फाटके फुटायला अजून वेळ असल्याचे म्हणत सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे. तर कायद्यात असणाऱ्या तरतूदी आणि संविधानातील नियम कायदे यांचं पालन करून जनतेला आणि कायद्याला अपेक्षित निर्णय देणार अल्याचा विश्वासही राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या खूप शुभेच्छा देखील दिल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Nov 12, 2023 02:31 PM
Latest Videos