Narhari Zirwal यांचीही इच्छा अजितदादा मुख्यमंत्री व्हावे? बघा काय म्हणाले
VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू की अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजे. निव्वळ साकडं घालून चालणार नाही, तर आपल्याला तेवढं झटावं लागेल लोकांपर्यंत जावं लागेल'
नाशिक, ७ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनाच्या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील भाष्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, प्रत्येक ठिकाणी अजित पवार यांचं दणक्यात स्वागत झालं. प्रत्येकानं सप्तश्रृंगीला एक मागितलं अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू की अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजे. निव्वळ साकडं घालून चालणार नाही, तर आपल्याला तेवढं झटावं लागेल लोकांपर्यंत जावं लागेल, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.