अरं बाबा त्याचा माझा काय संबंध… आमदार अपात्र प्रकरणावर विचारताच झिरवळ भडकले
आमदार अपात्रता प्रकरणावर नेमका काय निकाल लागतो? ठाकरे गट की शिंदे गट अपात्र होणार? यावर येत्या दोन दिवसात फैसला होणार आहे. अशातच नार्वेकर हे आजारी पडल्याचीही चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांना चांगलंच घेरलं आहे.
नाशिक, ८ जानेवारी २०२४ : शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रता प्रकरणावर अर्थात राज्यातील सत्ता संघर्षावर १० जानेवारी रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रता प्रकरणावर नेमका काय निकाल लागतो? ठाकरे गट की शिंदे गट अपात्र होणार? यावर येत्या दोन दिवसात फैसला होणार आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. दरम्यान दीर्घकाळ सुनावणी घेतल्यानंतर आता येत्या १० जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर निकाल देण्याची शक्यता आहे. अशातच नार्वेकर हे आजारी पडल्याचीही चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांना चांगलंच घेरलं आहे. तर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विचारणा केली असता ते काहीसे भडकल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा आणि माझा काय संबंध ? असा सवाल करत मी तेव्हा ठाम होतो, आता मी तिथे नाही, मी काय बोलणार ? असं भाष्य करत त्यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.