जीव धोक्यात घातला, पण कर्तव्य बजावलं! नदीच्या पुलावरच लोको पायलटकडून ट्रेनची अलार्म चैन रिसेट
गोदान एक्स्प्रेस टिटवाळा आणि खडवली स्थानकांदम्यान नदीच्या पुलावर थांबलेली होती. त्यावेळी कुणीतरी अलार्म चैन ओढली. यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी तातडीनं अलार्म चेन सेट करणं आवश्यक होतं.
जीव धोक्यात घोलून एका लोको पायलटनं आपलं कर्तव्य बजवालंय. या लोको पायलटच्या धाडसाचं कौतुक होतंय. नदीच्या पुलावर लोको पायलटनं ट्रेनची अलार्म चेन रिसेट केली आणि मोठा धोका टाळलाय. रेल्वेच्या वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित व्हिडीओदेखील त्यांनी ट्वीट केलाय. गोदान एक्स्प्रेसचं चैन पुलिंग यावेळी सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी रिसेट केलं. पण ज्या ठिकाणी त्यांनी हे काम केलं, ते विशेष आहे. गोदान एक्स्प्रेस टिटवाळा आणि खडवली स्थानकांदम्यान नदीच्या पुलावर थांबलेली होती. त्यावेळी कुणीतरी अलार्म चैन ओढली. यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी तातडीनं अलार्म चेन सेट करणं आवश्यक होतं. त्यानुसार सतीश कुमार हे तातडीनं पुढे सरसावले. त्यांनी गाडी नदीच्या पुलावर असतानाच रेल्वे ट्रॅकवरुन जात गाडीच्या खालील बाजूस जाऊन हे अलार्म रिसेट केलंय. त्यांनी केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. दरम्यान प्रवाशांनी अशाप्रकारे विनाकारण अलार्म चैन ओढू नये, असं आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून सातत्यानं केलं जातंय.