औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला, जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर हल्ला होणं अयोग्य आहे, आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देऊन पोलिसांनी चौकशी करावी, भाजपचे नेते प्रसाद लाड यांची मागणी
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमधील कार्यक्रमादरम्यान रमाई यांची मिरवणूक थांबवल्यामुळे राडा झाला. मात्र आदित्य ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर जमावाने माघार घेतली. तर आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना मुद्दाम दगडफेक घडवण्यात आली असा अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर हल्ला होणं अयोग्य आहे, आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देऊन पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज साडेबारा वाजता पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद मातोश्रीवर घेण्यात येणार असून कुणाचा समाचार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून फडणवीसांच्या आदेशानुसार प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. तर शिंदे- फडणवीसांची स्वतंत्र जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.