AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारल्यामुळे दोन आरोपींचा तरुणावर हल्ला

Nashik | वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारल्यामुळे दोन आरोपींचा तरुणावर हल्ला

| Updated on: Dec 14, 2021 | 3:28 PM

वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक वाघमारे या तरुणावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक वाघमारे या तरुणावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून, हल्ला आणि दरोड्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, गुन्हेगारीला आळा घालावा, अशीच मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

नाशिकमधील आडगाव परिसरात दीपक वाघमारे या तरुणाने वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली. त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, तिथे असलेल्या इतरांना हा प्रकार रुचला नाही. त्यातल्या दोघांनी दीपकवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे दीपक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अतिशय किरकोळ कारणावरून हा हल्ला केल्याने नाशिकमधील गुन्हेगारी कशा पद्धतीने वाढत आहे, हेच पुन्हा एकदा समोर आले आहे.