संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित, मनसेनं काय केला आरोप? कसा झाला हल्ला?

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित, मनसेनं काय केला आरोप? कसा झाला हल्ला?

| Updated on: Mar 03, 2023 | 9:17 AM

VIDEO | संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कुणी केला? का केला? हे अजूनही गुलदस्त्यात मात्र आम्ही त्याचा शोध लावूच,

कृष्णा सोनारवाडकर , मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ‘संदीप देशपांडे यांना एकटं गाठून हा हल्ला करण्यात आला आहे. हा पूर्वनियोजित हल्ला आहे, असा दावा करतानाच हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही शोधून काढूच’, असा इशारा मनसेचे नेते संतोष धुरी यांनी दिला आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही हल्लेखोरांचा शोध घेऊच. कशाकरीता हल्ला झाला? कोणत्या कारणामुळे झाला? आणि कोणी केला ? ते माहीत नाही. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 03, 2023 09:13 AM