Crime News : शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर अज्ञातांकडून हल्ला; गाडीच्या काचाही फोडल्या
त्याचदरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे एका विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्या आला असून त्यात सुदैवाने त्यास कोणतिही इजा झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्यावर हा हल्ला झाला असून तो अज्ञाताकडून करण्यात आला आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | सध्या राजकीय नेते आणि प्रमुखांवर हल्ले आणि धमक्यांचे सत्र सुरू आहे. मागिल काही दिवसापासून अनेकांना धमक्या आल्या आहेत. त्याचदरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे एका विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्या आला असून त्यात सुदैवाने त्यास कोणतिही इजा झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्यावर हा हल्ला झाला असून तो अज्ञाताकडून करण्यात आला आहे. हा हल्ला सात बंगला मेट्रो स्टेशनच्या जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आला. तर हल्लाकरणाऱ्या अज्ञाताने गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तर आज माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे, ते कोण आहेत याचा तपास वर्सोवा पोलीस करत आहेत अशी प्रतिक्रिया पेवेकर यांनी दिली आहे. तर असा हल्ला करून त्यांना काय साध्य करायचं होतं. याच्या मागे राजकीय रंग दिसत आहे. पोलिस आता त्याचा शोध घेतील अस म्हणताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात कोणावरती अन्याय होणार नाही याची मला खात्री असल्याचंही ते म्हणाले.