VIDEO : Sharad Pawar | अडीच वर्षापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न : शरद पवार
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा 2 वेळा प्रयत्न झाला, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की, अडीच वर्षापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना इतरत्र नेऊन ठेवण्यात आले होते. मात्र तेथूनही आमदार परत आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा 2 वेळा प्रयत्न झाला, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की, अडीच वर्षापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना इतरत्र नेऊन ठेवण्यात आले होते. मात्र तेथूनही आमदार परत आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आज महाराष्ट्रात निर्माण झालेल्या स्थितीतूनही काहीतरी मार्ग निघेल, मला विश्वास आहे, असं वक्तव्य शरद पवार यानी केले. मात्र, यादरम्यान बोलताना पवार म्हणाले की, शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. कारण मुख्यमंत्री पद त्यांच्याकडेच आहे. उपमुख्यमंत्री आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री आज बैठक घेतील. त्यानंतर आमची बैठक होईल.
Published on: Jun 21, 2022 03:00 PM
Latest Videos