वाहनाची काच फोडून चोरीचा प्रयत्न, पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले
नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीची काच फोडून चोरट्याने वाहनामधील सामान चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोराला पोलिसांनी रंगेहात पकडल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीची काच फोडून चोरट्याने वाहनामधील सामान चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोराला पोलिसांनी रंगेहात पकडल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आरोपीकडून तब्बल आठ लॅपटॉप आणि एक कार असा एकूण 5 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी सुरू असून, त्याचा आणखी काही गुन्ह्यात समावेश आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Latest Videos