Video | येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयानक संकट येणार : अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयंकर संकट येणार असल्याचे भाकीत वर्तविले. तसेच शिवसेनेने मुंबईची तुंबई केल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. आज मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले. तसेच ठिकठिकाणी पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयंकर संकट येणार असल्याचे भाकीत वर्तविले. तसेच शिवसेनेने मुंबईची तुंबई केल्याचा आरोप त्यांनी केला. (atul bhatkhalkar criticized shiv sena on issue of heavy rain in mumbai)
Latest Videos