Aurangabad Breaking | औरंगाबादमध्ये पैठणसाठी वॉटरग्रीड योजना मंजूर, गावा-गावांमध्ये उत्साहाचं वातावरण

| Updated on: Jun 25, 2021 | 9:32 AM

वॉटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील 200 गावांना थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 285 कोटी रुपये खर्चून सातशे किलोमीटर पाईपलाईन टाकत ही योजना पूर्ण केली जाणार आहे.

वॉटर ग्रीड योजना मंजूर झाल्यानंतर पैठणमध्ये जल्लोष करण्यात आला. गावागावात गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचं औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

वॉटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील 200 गावांना थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 285 कोटी रुपये खर्चून सातशे किलोमीटर पाईपलाईन टाकत ही योजना पूर्ण केली जाणार आहे. (Aurangabad Breaking Water grid scheme approved for Paithan in Aurangabad)