इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार? ‘त्या’ वक्तव्यावरून कोर्टानं दिले ‘हे’ आदेश
VIDEO | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ वक्तव्यावरून इंदोरीकर महाराजांना कोर्टानं काय दिले आदेष?
औरंगाबाद : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेलं एक वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगाशी आलंय. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार आहेत. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे.
Published on: Jun 16, 2023 02:35 PM
Latest Videos