Aurangabad | औरंगाबादमध्ये नुकसान भरपाईसाठी तरुण शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन

Aurangabad | औरंगाबादमध्ये नुकसान भरपाईसाठी तरुण शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन

| Updated on: Oct 05, 2021 | 2:44 PM

औरंगाबादमधील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरुण शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. औरंगाबादच्या सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनासाठी तरुण उतरला आहे.

औरंगाबादमधील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरुण शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. औरंगाबादच्या सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनासाठी तरुण उतरला आहे. तरुणानं नुकसान भरपाई मिळाली नाही तर विष प्राशन करून जलसमाधी करणार असल्याचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन तरुणाचं आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा विष प्राशन करून घेणार जलसमाधी असा इशारा त्यानं दिला होता. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी अजूनही राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीकडं डोळे लावून बसले आहेत.