हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी

हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी

| Updated on: Mar 14, 2022 | 11:22 AM

हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे.

हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे शहरात आगमन झाले आहे.  दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. या कार्यक्रम होऊ नये, असे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर भाजपचा विरोधा काहीसा मावळलेला दिसतानाच आता पोलिसांनी या कार्यक्रमाला आडकाठी घातली आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन कऱण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

Published on: Mar 14, 2022 11:22 AM