Dhule Accident | धुळे डेपोच्या तिरप्या बसमुळे अपघातांना निमंत्रण
सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरप्या चालणाऱ्या एसटी बसचा व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती आहे.
सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरप्या चालणाऱ्या एसटी बसचा व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी चालकाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तर आणखी काही बाईकस्वारही जखमी झाल्याची माहिती आहे. तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला.
Latest Videos