Aurangzeb tomb Video : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरातलं वातावरण तापलं, बघा कुठं अन् कसा झाला अंत?
राज्यभरात आलमगीर औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. आलमगीर औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात हिंदुत्ववादी संघटना आणि बंजरंग दलासह विश्व हिंदू परिषद चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली झाला आणि त्यानंतर त्याचं पारंपारिक दफनविधीसाठी संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथेच त्याचे दफनविधी करण्यात आले असून त्याची कबर देखील तिथेच आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी ही कबर आणि या ठिकाणचा चबुतरा हटवण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी राज्यातील सगळेच हिंदू संघटना किंवा राजकीय पक्ष करत आहेत. मात्र औरंगजेबाचे जे शेवटचे काही दिवस आहेत ते अहिल्यानगरच्या या भिंगार येथील आलमगीर या परिसरामध्ये गेले होते. ज्या ठिकाणी औरंगजेब वास्तव्यास होता आणि याच ठिकाणी 1707 साली त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याला खुलताबाद येथे नेऊन त्याचा दफनविधी करण्यात आला होता. हा सगळ्या घटनांच्या दरम्यान, अहिल्यानगरच्या परिसरात औरंगजेबाने त्याचे शेवटचे काही दिवस घालवले होते. आता त्याची हीच कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?

6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा

भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
