नागपुरात ऑटो रिक्षाच्या प्रवासी भाड्यात वाढ, प्रवाशांच्या खिशाला झळ
गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून सुरू होती. अखेर आज भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात तब्बल आठ वर्षांनंतर आरटीओकडून भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
नागपूरकरांना आता रिक्षाच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ऑटोरिक्षाचा प्रवास महाग झाला आहे. प्रति कोलोमीटरमागे रिक्षाच्या भाड्यात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक किलोमीटरसाठी 18 रुपये तर दीड किलोमीटरसाठी 27 रुपयांचे भाडे द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. तसेच आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आल्याने वाहन कर्ज देखील महाग झाले आहे. वाहन करात देखील वाढ करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून सुरू होती. अखेर आज भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात तब्बल आठ वर्षांनंतर आरटीओकडून भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
Latest Videos