पुन्हा ठाण्यात राजकारण पेटलं; शाईफेकनंतर अयोध्या पोळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘बनाव करून…’
ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. त्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात याची तक्रार केली. यानंतर त्यांनी, ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाचा कार्यक्रमच असल्याचं मागील काही दिवसापासून सांगण्यात येत होतं.
ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाई फेक तसेच मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. त्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात याची तक्रार केली. यानंतर त्यांनी, ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाचा कार्यक्रमच असल्याचं मागील काही दिवसापासून सांगण्यात येत होतं. याच बनावट कार्यक्रमचा बनाव करून मला जाणून बुझून बोलवण्यात आलं होतं. मी कार्यक्रमात आल्यावर मला शंका झाला की या कार्यक्रमात आपल्या गटाचे कोणीच नाहीत. त्यानंतर महापुरुषांना हार घातल्यानंतर एका महिलेकडून तुम्ही बाबा साहेबांचा अपमान केलात म्हणत माझ्यावर शाई फेम आणि मारहान झाली. हे सर्व षडयंत्र होतं, मला षडयंत्र करून इथे बोलवण्यात आला होता असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आपण सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाचं बाजू मांडत असतो त्यातून हा हल्ला झाल्याचेही त्या म्हणाल्या.