Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी भलं मोठं कुलूप, 400 किलोचं वजन तर चावी किती किलोची?
महामंडलेश्वर डॉ.अन्नपूर्णा भारती पुरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या कुलूपाच्या ३ फूट ४ इंच लांब किल्लीचे वजन सुमारे ३० किलोग्रॅम आहे. या भल्यामोठ्या कुलूपासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च आला आहे. तर अलीगडमधून अन्नपूर्णा भारती यांनी हे मोठं कुलूप अयोध्येत आणलं आहे.
अयोध्या, २० जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच ज्याला जसं जमेल तसं राम मंदिरासाठी योगदान देत आहे. अलिगढ महानगरातील क्वार्सी पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वालापुरी येथील रहिवासी सत्यप्रकाश शर्मा यांचे ४०० किलो वजनाचे कुलूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे. हे कुलूप जगातील सर्वात मोठे कुलूप असल्याचे सांगितले जात आहे. हे कुलूप सत्यप्रकाश शर्मा यांच्या पत्नी रुक्मणी देवी आणि मुलगा महेश चंद यांनी बनवले. हे कुलूप अयोध्येत पाठवण्यासाठी महामंडलेश्वर डॉ.अन्नपूर्णा भारती पुरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या कुलूपाच्या ३ फूट ४ इंच लांब किल्लीचे वजन सुमारे ३० किलोग्रॅम आहे. या भल्यामोठ्या कुलूपासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च आला आहे. तर अलीगडमधून अन्नपूर्णा भारती यांनी हे मोठं कुलूप अयोध्येत आणलं आहे. अयोध्येतील राम मंदिर परिसरात हे ठेवावं या भावनेने हे मोठं कुलूप आणलं आहे. हे भलं मोठं कुलूप पाहण्यासाठी अयोध्येत मोठी गर्दी जमा झाली आहे.