अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर जंगी तयारी, १००८ शिवलिंगासह १०० कुंडात होणार महायज्ञ
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील बहुप्रतिक्षित अशा रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण होणार आहे. हा दिवस सुवर्ण अक्षरांनी इतिहासाच्या पानांवर कोरला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना शरयू नदीच्या तीरावर महायज्ञाची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर तब्बल १ हजार ८ झोपडीच्या आकाराचे शिवलिंग तयार करण्यात आलेत
अयोध्या, ८ जानेवारी, २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील बहुप्रतिक्षित अशा रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण होणार आहे. हा दिवस सुवर्ण अक्षरांनी इतिहासाच्या पानांवर कोरला जाणार आहे. या दिवसाची प्रत्येक भारतीयाला उत्सुकता आहे. अयोध्येतील रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या दिवसाकडे प्रत्येक जण डोळे लावून आहे. अशातच अयोध्येतील दिवाळी, दसरा असल्यासारखे वातावरण तयार झाले आहे. तर अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना शरयू नदीच्या तीरावर महायज्ञाची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर तब्बल १ हजार ८ झोपडीच्या आकाराचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. या तीरावर १००८ शिवलिंग आणि १०० कुंडात महायज्ञ करण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या महायज्ञाची तयारी नेपाळी भवन कडून करण्यात आली आहे. त्यामुळे शरयू नदीच्या तीरावर भव्यदिव रूप पाहायला मिळणार आहे.