Ayodhya Ram Mandir : असं आहे अयोध्येतील राम मंदिराच्या आतील नक्षीकाम, बघा EXCLUSIVE दृश्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिरातील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अशातच संपूर्ण देशासह अयोध्या नगरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. मंदिर परिसर आणि मंदिराला भव्य आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अयोध्या, १९ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिरातील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अशातच संपूर्ण देशासह अयोध्या नगरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. मंदिर परिसर आणि मंदिराला भव्य आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची लगबग सध्या संपू्र्ण अयोध्येत सुरू असून अयोध्यावासियांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज सकाळी या मंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लांच्या मुर्तीचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता मंदिरातील बारीक, सुबक आणि मनमोहक नक्षीकाम समोर आले आहे. राम मंदिराच्या आतील बाजूस असणाऱ्या नक्षीकामाची मनमोहक दृश्य tv9च्या प्रेक्षकांसाठी खास दाखवण्यात येत आहे. बघा कसं आहे मंदिराच्या आतील बाजूचं नक्षीकाम….?