प्रभू रामचंद्रासह मोदींची भव्य रांगोळी, १५ हजार स्क्वेअर फुटाच्या रांगोळीची कुठं होतेय चर्चा?
रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनोखा पद्धतीने साजरा करण्यासाठी जळगावात तब्बल 15000 स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्रीरामचंद्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे.
जळगाव, २१ जानेवारी २०२४ : अयोध्या येथे उद्या होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनोखा पद्धतीने साजरा करण्यासाठी जळगावात तब्बल 15000 स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्रीरामचंद्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. पाचोरा येथील कला छंद आर्ट फाउंडेशनचे दहा ते बारा विद्यार्थी जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर ही गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही भव्य दिव्य रांगोळी साकारत आहेत. यासाठी तब्बल अडीच हजार किलो रांगोळी लागली असून त्यातून ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात येत आहे. उद्या सकाळपासून दिवसभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य रांगोळी पाहण्याची जळगावकरांना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जळगावकरांनी उपस्थिती देऊन ही रांगोळी पहावी असं आवाहन करण्यात आलेला आहे.