Ayodha Ram Mandir : अयोध्येतील शरयूच्या तीरावर रामभक्तांची गर्दी, पवित्र नदीत स्नान

Ayodha Ram Mandir : अयोध्येतील शरयूच्या तीरावर रामभक्तांची गर्दी, पवित्र नदीत स्नान

| Updated on: Jan 22, 2024 | 11:10 AM

तब्बल ५०० वर्षांनंतर राम आपल्या घरी पुन्हा परतणार असल्याने रामभक्तांमध्ये वेगळंच वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह पूर्णच देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. राजकीय व्हीआयपी नेते, कलाकार, साधू-संत, कारसेवक यांच्यासह भाविकही अयोध्येत दाखल

अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा आज होणार आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर राम आपल्या घरी पुन्हा परतणार असल्याने रामभक्तांमध्ये वेगळंच वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह पूर्णच देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. राजकीय व्हीआयपी नेते, कलाकार, साधू-संत, कारसेवक यांच्यासह भाविकही अयोध्येत दाखल होत आहे. दरम्यान आज पहाटेच अनन्य साधारण महत्त्व असलेल्या अयोध्येतील शरयू घाटावर रामभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. राम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणार असल्याने त्याचा वेगळा आनंदच जनमाणसात पाहायला मिळत आहे. सकाळीच शरयू नदीवर साधूसंत यांच्यांसह रामभक्तांनी गर्दी करत अभ्यंग स्नान केले. शरयू नदीच्या मधोमध २५ फूटांचं भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आलंय. यावरच शरयू नदीची पूजा केली जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी अयोध्येतील दाखल होतील आणि सोहळा सूरू होईल त्यांची लाईव्ह दृश्य या स्क्रीनवर भक्तांना पाहता येणार आहे.

Published on: Jan 22, 2024 11:10 AM