हाती रूद्राक्षांची माळ... अंगावर भगवी शाल... हुबेहुब बाळासाहेबच, नंदुरबारचे रणजीत अयोध्येत

हाती रूद्राक्षांची माळ… अंगावर भगवी शाल… हुबेहुब बाळासाहेबच, नंदुरबारचे रणजीत अयोध्येत

| Updated on: Jan 18, 2024 | 11:25 PM

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रणजीत राजपूत बाळासाहेबांच्या रुपात अयोध्येत दाखल झालेत. “बाळासाहेबांच्या वतीनं मी इथे आलोय, श्री रामाचं दर्शन घेणार. बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण होतंय. मोदी यांनी अयोध्येचा कायापालट केलाय”. तर २२ जानेवारीपर्यंत रणजीत राजपूत अयोध्येत मुक्कामी आहे. 

अयोध्या, १८ जानेवारी २०२४ : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहात रामललाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासून राम मंदिराशी संबंधित धार्मिक विधी सुरू झाले आहेत. हे विधी 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपणार आहे. अशातच महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रणजीत राजपूत बाळासाहेबांच्या रुपात अयोध्येत दाखल झालेत. “बाळासाहेबांच्या वतीनं मी इथे आलोय, श्री रामाचं दर्शन घेणार. बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण होतंय. मोदी यांनी अयोध्येचा कायापालट केलाय” असं बाळासाहेब ठाकरे पेहरावात अयोध्येत आलेले रणजीत राजपूत सांगतात. २२ जानेवारीपर्यंत रणजीत राजपूत अयोध्येत मुक्कामी आहे.

Published on: Jan 18, 2024 11:25 PM