Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला होणाऱ्या उद्धाटनाला येऊ नका, राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय असं का म्हणाले?
नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या दिवसाची समस्त हिंदू आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनीच राम भक्तांना सांगितलं 22 जानेवारीच्या उद्धाटनाला येऊ नका!
नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३ : नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या दिवसाची समस्त हिंदू आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सर्वसामान्य भाविकांना आवाहन केले की, त्यांनी या सोहळ्यादरम्यान अयोध्येत येऊ नये. 22 जानेवारीला अयोध्येत येण्याऐवजी तुमच्या जवळच्या मंदिरात ‘आनंद महोत्सव’ साजरा करा. तुमच्या जवळच्या मंदिरात एकत्र या, मग ते लहान असो किंवा मोठे… ज्या मंदिरात जाणं शक्य असेल, तिथे जा. प्रत्यक्षात शहरात येणारी लाखोंची गर्दी टाळण्यासाठी चंपत राय यांनी पायाभरणी समारंभात न येण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Dec 18, 2023 12:01 PM
Latest Videos