Dhirendra Shastri : ‘त्यांनी आपल्या घरात कबर बनवा’, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्ट मत
WITT Global Summit 2025: टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या महामंचाच्या तिसऱ्या पर्वाच्या आज दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त आज बागेश्वर धामचे बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हजेरी लावली. यावेळी पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर आपले परखड मत व्यक्त केले.
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद रंगताना दिसतोय. अशातच बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी घरात कबर बनवावी’, असं बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर देश तोडण्याचं ज्यांनी काम केलं त्यांचा नामोनिशाण मिटवलं पाहिजे, असं म्हणत औरंगजेबाच्या कबरी संताप व्यक्त केला.
औरंगजेब ३०० वर्षांपूर्वी मरण पावला, मात्र आता त्याची कबर खोदण्याची मागणी केली जात आहे. यावर धीरेंद्र शास्त्रींना सवाल केला असता ते म्हणाले की, देशाचे विभाजन करणाऱ्यांचा नाश केला पाहिजे. देशाचे विभाजन करणारा व्यक्ती महान असू शकत नाही. ज्यांना औरंगजेबाची कबर आवडते ज्यांचं औरंगजेब आणि त्याच्या कबरीवर प्रेम आहे त्यांनी त्यांच्या घरात औरंगजेबाची कबर बनवावी. ही औरंगजेबावर प्रेम करणाऱ्यांचा वैयक्तिक आस्था असू शकते. पण देश हा संविधानाने चालवला जातो. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्ही तुमचे विचार इतरांवर लादू शकत नाही, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
