बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीच्या मुसक्या अवळल्या, कोण आहे चौथा आरोपी?
शनिवारी रात्री सव्वा ९ साडे नऊ वाजेदरम्यान, मुंबईतल्या वांद्रेमधील खेरवाडी परिसरात बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकीच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडून हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या प्रकरणात चौथा आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या चौथ्या आरोपीचे नाव हरीशकुमार बालकराम असं असून या २३ वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरीशकुमार बालकराम या आरोपीवर इतर आरोपींना पैस आणि इतर वस्तू पुरवल्याचा आरोप आहे. उत्तरप्रदेशातील बहराइचमधून चौथ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. हा आरोपी पुण्यातील आरोपींसोबत स्क्रॅप डिलर म्हणून काम करायचा अशीही माहिती समोर येत आहे. गेल्या शनिवारी रात्री सव्वा ९ वाजेदरम्यान झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकींसोबत कार्यालयातून निघाले होते. पण त्यावेळी त्यांना एक फोन आला आणि ते परत कार्यालयात गेले. मात्र बाबा सिद्दीकी कार्यालयाच्या बाहेर पडून काही मिटर अंतरावर कारची वाट पाहत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत अशातच चौथ्या आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी अवळल्या आहेत.