वडीलांकडील नात्यात कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत पूर्वीपासून, बबनराव तायवाडे यांचे स्पष्टीकरण

वडीलांकडील नात्यात कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत पूर्वीपासून, बबनराव तायवाडे यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jan 27, 2024 | 4:06 PM

सरकारच्या नव्या निर्णयाने ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याने आपण समाधानी आहोत असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. या सगेसोयरे बाबतचा संपूर्ण जीआर आपण वाचलेला नाही, त्यामुळे त्यावर आपल्याला सध्या काही प्रतिक्रीया देता येणार नाही. परंतू आता पत्रकारांनी वाचून दाखविलेल्या प्रमाणे जीआर असेल तर वडीलांकडील नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळण्याची तरतूद पूर्वीपासूनच असल्याचे तायवाडे यांनी म्हटले आहे.

नागपुर | 27 जानेवारी : मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत मुंबईला न जाता नवीमुंबईतून मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश जारी केल्याने मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सध्या तरी सरकारच्या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज समाधानी आहे. वडीलांकडील नात्यातील आजोबा, किंवा काका यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर चुलत भावांना प्रमाणपत्र पूर्वीही मिळत होते. आईकडील नातेवाईकांना ते देता येत नाही. जरांगे यांनी सरकारने नोकरी भरती करताना मराठ्यांच्या जागा सोडून भरती करावी अशी मागणी केली होती. परंतू असाही कुठे निर्णय झालेला नाही. तसेच आमच्या कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. कुणबी जातीच्या 99.5 टक्के नोंदी जुन्याच आहेत. मुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांनी 29 सप्टेंबरला जो शब्द दिला होता. आणि 13 तारखेला जे लेखी आश्वासन दिले होते त्यावर सरकार ठाम राहिले असल्याने आपण समाधानी असल्याचे तायवाडे यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 27, 2024 04:05 PM