Babasaheb Purandare | बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांचा चरणस्पर्श करायचे त्यातले बाबासाहेब एक : संजय राऊत
मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते.
पुणे : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. यावेळी शिवसेनानेते संजय राऊत यांनी बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांचा चरणस्पर्श करायचे त्यातले बाबासाहेब एक अशी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.
Latest Videos