मुंबईतील 'या' जलतरण तलावात आढळलं मगरीचं पिल्लू अन्...

मुंबईतील ‘या’ जलतरण तलावात आढळलं मगरीचं पिल्लू अन्…

| Updated on: Oct 03, 2023 | 3:09 PM

VIDEO | दादर येथील शिवाजी पार्कमधील मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आज मगरीचे छोटे पिल्लू आढळल्याचे समोर आले आहे. जलतरण तलावात मगरीचं पिल्लू आढळल्याची माहिती कळताच स्वीमरच्या मनात भितीचं वातावरण पसरलं आहे. मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाने पिल्लाला सुखरुप बाहेर काढलं

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | दादर येथील शिवाजी पार्कमधील मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आज मगरीचे छोटे पिल्लू आढळल्याचे समोर आले आहे. जलतरण तलावात मगरीचं पिल्लू आढळल्याने एकच गोंधळ उडालाय. सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान हे पिल्लू पाण्यात आढळल्यानंतर त्याला पालिका कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाने पिल्लाला सुखरुप बाहेर काढलं आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे मगरीचं पिल्लू प्राणी मित्रांच्या हवाले दिलं आहे. दादरमधील महात्मा गांधी जलतरण तलावात हे पिल्लू आढळल्याने स्वीमरच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय असल्याने हे प्राणी येत असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर सकाळच्या सुमारास हे मगरीचं हे पिल्लू स्वीमिंग पूलमधील पाण्यात फिरत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Published on: Oct 03, 2023 03:09 PM