भाजपमध्ये माझं योगदान शून्य… नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?
नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आणि तो कायम आहे. अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली आहे. त्या म्हणाल्या, माझं योगदान भाजपमध्ये शून्य सुद्धा नाही मी फक्त....
अमरावती मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आणि तो कायम आहे. अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली आहे. त्या म्हणाल्या, माझं योगदान भाजपमध्ये शून्य सुद्धा नाही, मी फक्त सुरूवात केली आहे. मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की, विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे. अचलपूर मतदारसंघ असो, किंवा मेळघाट विधानसभा असो जिथे कोणी उमेदवार पोहचू शकणार नाही तिथे मी पोहोचले, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटले तर वल्गना करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, अचलपूर मतदारसंघ, मेळघाट मतदारसंघ असो किंवा अमरावती मतदारसंघ त्यांना त्यांची जागा दाखून द्यायची आहे असे म्हणत अनिल बोंडे यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.