रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
'निवडणुकीत कुणीही वैयक्तिक टीका, आरोप करू नयेत. सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगले आहेत. दिनेश बुब यांनी ज्याप्रकारे काम केलं. तसं रवी राणांना केलं नाही. पण तुम्ही खालच्या पातळीवर जाताय हे चांगलं नाही,'
रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे. अमरावतीत प्रहारचे उमेदवार प्रशांत बूब आणि भाजपकडून नवनीत राणा यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे. निवडणुकीत कुणीही वैयक्तिक टीका, आरोप करू नयेत. सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगले आहेत. दिनेश बुब यांनी ज्याप्रकारे काम केलं. तसं रवी राणांना केलं नाही. आपण जर चित्रपटातील सीन पाहिले तर खुलेआम तुम्ही दारू पितांना दिसतात. पण तुम्ही खालच्या पातळीवर जाताय हे चांगलं नाही, असे बच्चू कडू म्हणाले. दर्यापूर येथे नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत फडणवीसांनी मित्रपक्षांचं नाव घेतलं पण बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, बरं झालं देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षाच्या यादीत आमचं नाव घेतलं नाही. त्यांनी नाव घेतलं असतं तर संभ्रम निर्माण झाला असता त्यांनी आमचं नाव न घेतलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आमच्या बाजूने आहे. तर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेय ही रवी राणांना जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले.