Bachchu Kadu यांच्या 'त्या' वक्तव्याची नवी चर्चा, म्हणाले, 'शिंदेंना तेव्हा म्हणालो, नाहीतर गाडीतून उतरणार'

Bachchu Kadu यांच्या ‘त्या’ वक्तव्याची नवी चर्चा, म्हणाले, ‘शिंदेंना तेव्हा म्हणालो, नाहीतर गाडीतून उतरणार’

| Updated on: Sep 18, 2023 | 7:45 AM

tv9 Special Report | 'एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आपण का गेलो, बळजबरी नेलं गेलं का? याबद्ददल बच्चू कडू काय म्हणाले होते आणि गुवाहाटीतून परत आल्यानंतर काय म्हणाले बघा टीव्ही ९ चा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | गुवाहाटीला गेलो म्हणूनच दिव्यांग मंत्रालय झालं., असं विधान बच्चू कडूंनी केलंय. गुवाहाटीला येण्यासाठी आपण शिंदेंना तशी अट घातली होती, असं बच्चू कडू म्हणाले. गुवाहाटील गेलो नसतो तर दिव्यांग मंत्रालय झालंच नसतं. असं म्हणत गुवाहाटासाठी दिव्यांग मंत्रालयाची आपली अट होती, असं बच्चू कडूंनी म्हटलंय. शिंदेंनी तसा शब्द दिल्यामुळेच आपण गुवाहाटीत गेल्याचाही दावा कडूंनी केलाय. याआधी बच्चू कडूंवर जेव्हा रवी राणांनी खोक्याचे आरोप केले होते, तेव्हा ते आरोप फेटाळत बच्चू कडू आपल्या फोनमुळे गुवाहाटीला गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावेळी मात्र शिंदेंनी फोनवरुन आपली अट मान्य केल्यामुळे आपण गुवाहाटी गेल्याचं बच्चू कडूंनी मह्टलंय. एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आपण का गेलो, बळजबरी नेलं गेलं का? याबद्ददल बच्चू कडू काय म्हणाले होते आणि गुवाहाटीतून परत आल्यानंतर काय म्हणाले. तेही बघा..

Published on: Sep 18, 2023 07:45 AM