अमरावती लोकसभेत बी टीमचा वाद बायकोपर्यंत; काय होताय आरोप-प्रत्यारोप?
कोण कुणाची बी टीम यावरून आमरावतीत लोकसभेत शाब्दिक वॉर सुरू आहे. प्रहार संघटना महायुतीमध्ये असून सुद्धा भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध दर्शवत आहे. अमरावतीमध्ये बी टीमचा वाद बायकोपर्यंत पोहोचला आहे. बी टीमच्या आरोपांनंतर बच्चू कडूंना राणांनी काय दिलं उत्तर बघा....
कोण कुणाची बी टीम यावरून आमरावतीत लोकसभेत शाब्दिक वॉर सुरू आहे. प्रहार संघटना महायुतीमध्ये असून सुद्धा भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध दर्शवत आहे. इतकंच नाहीतर अमरावतीतच बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केलाय. त्यावरून बच्चू कडू काँग्रेस बी टीम असल्याच्या आरोपावर राणांची पत्नी तरी त्यांच्या टीममध्ये आहे का? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय. २०१९ मध्ये अपक्ष नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार बनल्या. मात्र जिंकल्यानतंर त्यांनी दोन महिन्यातच भाजपला पाठिंबा दिला. आता २०२४ ला भाजपात प्रवेश करून यंदा नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अमरावतीमध्ये यंदा लोकसभेची चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. कारण, भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे, आरपीआयचे आनंदराज आंबेडकर आणि प्रहारचे दिनेश बूब हे लोकसभेच्यचा मैदानात आहेत. त्यामुळे विजयी कोण होणार? याचीच चर्चा सध्या होतेय.