निवडणुकीनंतर निकष आठवले, आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
निवडणुकीआधी डोळे बंद करून मंजूर झालेल्या हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज आता भिंगाऊन मोठ्या चष्म्याद्वारे बारकाईने तपासले जाण्याची चर्चा आहे. मात्र जर निवडणुकीनंतर निकष आठवले असतील तर आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, असा घरचा आहेर बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे.
लाडक्या बहिणी योजनासाठी सरकारकडून काही निकष लावण्यात येणार आहेत. दरम्यान निवडणुकीनंतर सरकारला निकष आठवले का असं म्हणत विरोधकांनी निषेध निदर्शनाचा साधला. तर लाडक्या बहिणी योजनेच्या निकषांप्रमाणे आमदारांच्या मानधनावरही निकष लावावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. निवडणुकीआधी डोळे बंद करून मंजूर झालेल्या हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज आता भिंगाऊन मोठ्या चष्म्याद्वारे बारकाईने तपासले जाण्याची चर्चा आहे. मात्र जर निवडणुकीनंतर निकष आठवले असतील तर आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, असा घरचा आहेर बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. तर ज्यांच्या तक्रारी येतील त्या लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यासाठी पाच निकष लावले जाणार आहेत. लाडक्या बहिणीच्या घरात कोणी टॅक्स भरत का याची आयकर विभागाकडून माहिती घेतली जाईल. लाडक्या बहिणीच्या घरी चारचाकी वाहन आहे का याची माहिती आरटीओकडून घेतली जाईल. लाडक्या बहिणीचे आधार खाती, मोबाईल क्रमांक, इतर तथ्य योग्य आहेत की नाही याची बँकांकडून खात्री जमा होईल. मात्र बच्चू कडूंनी उपस्थित केलेला मुद्दाही सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. आमदारांच्या लाखोंच्या पेन्शनला जर एकही निकष नसेल तर मग लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयांना निकष का याची तुलना होऊ लागली आहे.