'एकाने बायकोला तर दुसऱ्याने बाबूला उमेदवारी दिली', बच्चू कडूंचा निशाणा नेमका कोणावर?

‘एकाने बायकोला तर दुसऱ्याने बाबूला उमेदवारी दिली’, बच्चू कडूंचा निशाणा नेमका कोणावर?

| Updated on: Nov 11, 2024 | 1:33 PM

एकाने बायको उभी केली तर दुसऱ्याने बाबू उभा केला, असं म्हणत बच्चू कडू यांची आर्वी विधानसभेतील महायुती तसेच आघाडीच्या उमेदवारावरुन टीका केली आहे. काय धंदा लावला ते समजत नाही, देवेंद्र फडणवीसांचा लिहिणारा बाबू इथं आमदार व्हायला लागतो. महाराष्ट्रात पन्नासेक अधिकाऱ्यांनी उमेदवारी घेतली आहे, असं बच्चू कडू यांनी वक्तव्य केलंय.

‘एकाने बायको उभी केली दुसऱ्याने बाबू उभा केला, पुढच्या विधानसभेत मुलगा उभा केला जाईल’, अशी परखड टीका बच्चू कडू यांनी आर्वी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेल्या उमेदवारांवर केली. आष्टी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जयकुमार बेलखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बच्चू कडू यांनी ही टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचा लिहिणारा बाबू इथं आमदार व्हायला लागतो, महाराष्ट्रात पन्नासेक अधिकाऱ्यांनी उमेदवारी घेतली. बच्चू कडू यांनी टीका करत महायुती आणि महाविकास आघाडीचा समाचार घेतला. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आष्टी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जयकुमार बेलखडे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांची सभा पार पडली, यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. पुढे ते म्हणाले पक्ष मोठा नाही तर कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करतो, अनेक गोष्टी धर्म आणि जातीच्या नावावर पेटविल्या जातात, हे नामर्दांची औलाद आहे. हे धर्म आणि जातीशिवाय निवडून येत नाही. पन्नास वर्षे काँग्रेस तर पंधरा वर्षे भाजप सत्तेत राहिली, महाराष्ट्रात काय बदल झाला. आजही तलाठी छाती ठोक आमच्यासमोर उभा असतो. प्रजेचं राज्य नाही तर कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांचं राज्य आहे. आमचं राज्य संपलं आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागतं, असं बच्चू कडू म्हणाले.

Published on: Nov 11, 2024 01:33 PM