‘शेवटी आलेल्यांना मंत्रिमंडळात पहिलं स्थान’, बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी
संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशीष जयस्वाल यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ही मंडळी नाराज झाल्याचं कळतंय.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “जे शिंदेंच्या सोबत शेवटी आले त्यांना मंत्रिमंडळामध्ये पहिलं स्थान मिळालं”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. जे शिंदेंसोबत सुरुवातीला आले, ते मात्र अद्याप मागेच आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. मंत्रिपद दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 जणांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले असून धुसफूस सुरू झाली आहे. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशीष जयस्वाल यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ही मंडळी नाराज झाल्याचं कळतंय.